E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वैष्णवीची हत्या झाली?
Samruddhi Dhayagude
22 May 2025
मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणीत धक्कादायक बाबी समोर
पिंपरी : मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजाभाऊ हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय-२४) हिने आत्महत्या केली की, तिची हत्या करून आत्महत्येचा बनाव करण्यात आला, याचा छडा लावणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे. दरम्यान, ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणी अहवालातून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. वैष्णवीच्या माहेरच्या वाकड येथील कस्पटे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या संशयास्पद मृत्यूबद्दल संताप व्यक्त केला आहे. डॉ. जयदेव ठाकरे व डॉ. एच.एस. ताटिया यांनी सादर केलेल्या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे याने पलायन केले. दरम्यान, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरारी असून त्यांचा शोध सुरु आहे. राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा राज्य कार्यकारिणी सदस्य आहे.
वैष्णवीच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असून, विषप्रयोगाची शक्यताही तपासली जात आहे. अहवालात डॉक्टरांनी, हत्या करून गळफास दिला असण्याची शक्यता व्यक्त केली असून, ती गांभीर्याने तपासावी, असे स्पष्ट निर्देश तपास अधिकार्यांना देण्यात आले आहेत.
प्राथमिकदृष्ट्या ही घटना आत्महत्येसारखी वाटत असली, तरीही शरीरावरील मारहाणीच्या खुणा आणि गळ्याभोवताली असलेल्या स्पष्ट खुणा पाहता, ही हत्या असल्याचा संशय नातेवाईकांना आहे. शुक्रवारी वैष्णवी शशांक हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. वैष्णवी यांना सासरच्या मंडळीकडून मानसिक आणि शारीरिक जाच होत असल्याचा आरोप आहे.
हुंड्यासाठी छळ करण्यात आला, असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ज्यावेळेस ही घटना घडली तेव्हा घरामध्ये आजेसासू, कामवाली, घर गड्याची मुलगी होती, हे पोलिस तपासात समोर आले. या प्रकरणाचा पारदर्शक तपास सुरु असल्याचे बावधन पोलिसांनी सांगितले. मात्र, अद्यापही बावधन पोलिसांच्या हाती राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे लागले नाहीत. या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. ते निर्दोष असतील तर ते फरार का आहेत? असाही प्रश्न विचारला जात आहे. वैष्णवीला लग्नात ५१ तोळे सोने, चांदीची भांडी आणि आलिशान मोटार भेट स्वरुपात देण्यात आली होती. यानंतरही, सासरकडील मंडळी आणखी पैशांची मागणी करत तिचा जाच करत होते, असे वैष्णवीच्या वडिलांनी म्हटले आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचेही वैष्णवीच्या वडिलांनी नमूद केले. पोलिसांनी हगवणे यांच्याकडे असलेली अलिशान मोटार जप्त केली. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वैष्णवीच्या वडिलांतर्फे शुभम हगवणे यांना अलिशान मोटारीची चावी देण्यात आली होती; ते छायाचित्रदेखील समोर आले आहे.
मृतदेहाच्या वैद्यकीय तपासणीत धक्कादायक बाबी समोर
फॉरेन्सिक अहवाल, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, तसेच आरोपींची पार्श्वभूमी यांचा अभ्यास करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. क्राइम सीनचे बारकाईने निरीक्षण, शवविच्छेदन अहवालातील तपशील, साक्षीदारांचे जबाब आणि डिजिटल पुरावे यांचा सखोल आढावा घेणे तपास अधिकार्यांसाठी आवश्यक ठरणार आहे.
Related
Articles
मुंबईत २४ तासांत १०६ मिमी पाऊस
28 May 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले
31 May 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
मुंबईत २४ तासांत १०६ मिमी पाऊस
28 May 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले
31 May 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
मुंबईत २४ तासांत १०६ मिमी पाऊस
28 May 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले
31 May 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
मुंबईत २४ तासांत १०६ मिमी पाऊस
28 May 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात चकमकीत शिकारी ठार
30 May 2025
व्यापार रोखण्याच्या धमकीमुळे अणुयुद्ध टळले
31 May 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
दहिवडीत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात